- प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्या सोबत दोन प्रतिनिधी मंडळे होती. या भेटीत त्यांनी गृहनिर्माण धोरण, निवृत्त पोलीस आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करत काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.
(हेही वाचा – पोलिसांना Google Map ने आसामऐवजी नेले नागालँडला; स्थानिकांनी घुसखोर समजून केला हल्ला)
मुख्य मुद्दे :
निवृत्त पोलीस कुटुंबीयांसाठी घरे : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निवृत्त पोलीस कुटुंबीयांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “दोन-तीन पिढ्या सेवेत असलेल्या पोलीस कुटुंबीयांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत.”
पाणीपुरवठा योजना : त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळातील सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेचा उल्लेख केला आणि मागील सरकारने यावर स्थगिती आणल्याचा आरोप केला. “गृहनिर्माण किंवा झोपडपट्टी न पाहता पाणीपुरवठा करणे हे सरकारचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पोलिसांच्या इमारतींची दुरुस्ती : मुंबईतील पोलिसांच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी तत्काळ पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.
मिल कामगारांसाठी बैठक : मिल कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आवाहन केले.
दावोस प्रकरण : दावोस परिषदेच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सूचना केली.
(हेही वाचा – Border – Gavaskar Debacle Review : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीची चौकशी होणार; पण, गंभीर, विराट, रोहित यांचं काय होणार?)
इतर मागण्या :
- टोरेस घोटाळ्यात कारवाई करावी.
- होर्डिंगमुळे शहराची प्रतिमा खराब होत असल्याने कठोर पावले उचलावीत.
- दिल्ली सरकारच्या आरोग्य आणि विकास योजनांची सकारात्मक दखल घेण्याचीही भूमिका त्यांनी मांडली.
ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्ट केले की, “जर सरकारने योग्य पावले उचलली, तर आम्ही त्यांचे कौतुक करायला मागेपुढे पाहणार नाही.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community