काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले. येत्या दोन दिवसांत त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या रडावरवर युवासेनाप्रमुख आमि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे ब-याचदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. केंद्र सरकारकडून विशेषत: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे.
( हेही वाचा: “अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा”; बाळासाहेबांसह राज ठाकरेंचा फोटो ट्वीट करत मनसेचे सूचक ट्वीट )
महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडीट सुरु
केंद्र सरकराने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडीट सुरुही केले आहे. मुंबई, पुणे,कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरु करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.