- प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, नवीन पाण्याची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली असून याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आणि त्यांचा शिवसेना उबाठा पक्षच असल्याचा थेट आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अँड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना केला. मुंबईत ठिकठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो असल्याने अनेक ठिकाणी पाणीच येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांकडे केल्या जात आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
(हेही वाचा – P. T. Usha : ऑलिम्पिक असोसिएशनचा कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी पी टी उषाने बोलावली विशेष बैठक )
सुमारे ९० च्या दशकामध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्या बाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने गठीत केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला. मुंबई महापालिकेने यातील मध्य वैतरणा प्रकल्प २०१४ ला पूर्ण केला. मात्र त्यानंतर एकही प्रकल्प महापालिकेने हाती घेतला नाही. गारगाई या धरणाच्या परवानग्या आणि नियोजन सुरू झाले होते. मात्र त्याही तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार राज्यात आणि महापालिकेत असताना हा प्रकल्पच रद्द केला. आणि आपल्या लाडक्या कंत्राटदारांच्या प्रेमातून अत्यंत महागडा असलेला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ४४०० कोटी रुपये होती. आता हा प्रकल्पही ८००० कोटी वर गेला तरी सुद्धा अद्याप त्याची निविदा निघालेली नाही. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. याला कारण आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळ खंडोबा, याचेच दुष्परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यावरून मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. त्यामुळे आज हे जे मुंबईत दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे त्याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरेच आहेत, या आरोपाचा आ. शेलार (Ashish Shelar) यांनी पुनरुच्चारही केला.
(हेही वाचा – Gang Rape in Mumbai: टॅक्सीच्यामागे तोंड दाबून CSMT परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार!)
मुंबईत ३४% टक्के पाणी गळती आहे असे महापालिका सांगते आहे. मग ती रोखण्याकरीता जी कोट्यावधीची कंत्राटे दिली, त्याचे पुढे झाले काय ? हे कळायला मार्ग नाही, असेही गंभीर आरोप आ. शेलार (Ashish Shelar) यांनी केला. समुद्राचे पाणी गोडे करणे याबाबत जागतिक पातळीवर अभ्यासांती सिद्ध झाले आहे की ते पर्यावरणाला घातक आहे, शिवाय खर्चिकही आहे. ही बाब आम्ही त्याही वेळा लक्षात आणून दिली होती. मात्र थातूरमातूर कारण देऊन हा प्रकल्प पुढे रेटला व गारगाई प्रकल्प रद्द केला. गारगाई प्रकल्पामध्ये बाधित होणारी झाडांचे पुनर्वसन व नवी वनराई निर्माण करण्यासाठी जागाही निश्चित झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्पच रद्द केला व आपल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहेत, याही आरोपाचा पुनरुच्चार करत त्यांनी उबाठावर निशाणा साधला.
(हेही वाचा – War : आता किम जोंग उन यांची अण्वस्त्र युद्धाची धमकी; आता पूर्व आशियात युद्ध पेटणार)
मुंबईत १०० ठिकाणी जल्लोष….
मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेलार यांनी यावेळी आभार मानत, भाजपातर्फे मुंबईत १०० ठिकाणी चौका चौकात याचा आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे. मराठी गाणी वाजवून मराठी साहित्यिकांना अभिनंदन करून तसेच काही ठिकाणी दिंडी ग्रंथ प्रदर्शन अशा विविध मार्गातून हा आनंदोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहितीही आ. शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.
तसेच या कामी शिवसेना उबाठा गटाचा कोणताही सहभाग नाही. ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतची समिती गठीत झाली तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत नव्हते, आणि आज निर्णय झाला तेव्हाही या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि सरकारमध्ये ठाकरे नाहीत. त्यामुळे याचे श्रेय लाटू नये, कारण याबाबत श्रेय घेणारे त्यांचे विश्र्वप्रवक्ते संजय राऊत आता नागडे झाले आहेत, असा खणखणीत टोलाही आ. शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community