बल्क ड्रॅग पार्क प्रकल्पही राज्यातून गेला – आदित्य ठाकरेंचा आरोप

85

कोणत्याही राज्यात २ लाख कोटींचा उद्योग दुसऱ्या राज्यात गेला असता, तर त्या राज्यातील मुख्यमंत्र्याने त्यांच्या उद्योग मंत्र्याचा राजीनामा मागितला असता, इतका मोठा उद्योग तुम्ही जाऊच कसा दिला, अशी विचारणा केली असती. खरेतर हा प्रकल्प महाराष्ट्रातच असला पाहिजे, कारण महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात तितका सहभाग घेतला आहे. असे असूनही आता बल्क ड्रग पार्क हा प्रकल्पही आपल्या हातून निघून जातो आहे. महाविकास आघाडी सरकारने जे जे काही प्रयत्न करून प्रकल्प महाराष्ट्रात आणले ते हे सरकार पळवून लावत आहे, अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री आता नवरात्रौला मंडळांना भेटण्यात व्यस्त राहतील 

डावस येथे आमच्यासोबत ६ राज्यांचेही प्रतिनिधी मंडळ होते, तरीही आम्ही केंद्र सरकारशी समन्वय करून ८० हजार कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो, मग या व्यवस्थेचे नेमके काय चुकते हे पाहायला पाहिजे. आता एअर बसचाही प्रकल्प हातून जाईल का, अशी भीती आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, कारण नवरात्री येणार आहे, तेव्हा सगळ्या मंडळांना रात्रभर भेटायला ते फिरतील, त्यांना वेळ मिळणार नाही, त्यांनी याही कामाकडे लक्ष द्यावे, अस खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

(हेही वाचा वेदांताचे खापर शिंदे-फडणवीस सरकरवर फोडू नका – उदय सामंत)

केंद्राच्या दबावामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला – सुभाष देसाई 

आम्ही जेव्हा फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती, तेव्हा त्यांना ३८ हजार कोटींचे पॅकेज दिले होते, त्यावर ते समाधानी होते, गुजरातचे पॅकेज १२ हजार कोटीपेक्षा कमी आहे, तरीही हा प्रकल्प गुजरातला केंद्र सरकारच्या दबावामुळे गेला आहे. २६ जुलै रोजी फॉक्सकॉनचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सरकारने अधिकृतपणे प्रसिद्धपत्रकही काढले होते. त्यासाठी तळेगाव आणि नागपूर येथे वेदांत प्रकल्प उभा केला जाईल, असे घोषित केले होते. त्यामध्ये या प्रकल्पाला केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे, असे म्हटले होते, मग ते सहकार्य गेले कुठे? हेच का ते सहकार्य? आता कातडी बचाव प्रयत्न सुरु आहेत. असेच प्रकल्प राज्यातून जात राहिले तर हे नेभळट सरकार राज्याचे नुकसान करेल, अशी टीका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.