…तेवढा महाराष्ट्र एकवटणार, आदित्य ठाकरेंचा भाजपावर निशाणा!

125

आदित्य ठाकरे मुंबईत कार्यक्रमावेळी उपस्थित असताना, एका खाजगी वाहिनीशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, भाजपाचा निवडणूक प्रचार सुरु झाल्याचे म्हणत यशवंत जाधवांच्या घरी सुरु असलेल्या धाड सत्राविरोधात त्यांनी भाष्य केले. जेवढं हे लोक केंद्रातून दबाव आणण्याचा प्रयत्न करणार, तितका महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हा महाराष्ट्र पॅटर्न

“मराठी भाषा दिन हा आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जगभरात आजचा दिवस साजरा करायला हवा”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेल्या प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीवरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. हे सगळं राजकारणासाठीच केलं जातंय. हा भाजपाचा प्रचार सुरू झाला आहे. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बंगाल पॅटर्न असेल किंवा महाराष्ट्र पॅटर्न असेल, अशा गोष्टी केंद्रीय यंत्रणांकडून वाढत जाणार. निवडणुकीपर्यंत हे सगळं होत जाणार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

( हेही वाचा :मुंबईच्या रस्त्यांच्या खोदकामावर ३८३ कोटींची मलमपट्टी: काळ्या यादीतील दोन कंपन्याही ठरल्या पात्र )

अजूनही छापेमारी सुरुच

शिवसेनेचे माझगावमधील नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यानंतर रविवारी तिसऱ्या दिवशी देखील छापेमारी सुरूच असल्याचं सांगितलं जात आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर, महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच, यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.