शिंदे गटाच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे; विधीमंडळाच्या पाय-यांवर व्यंगचित्राच्या बॅनरसह घोषणाबाजी

153

Maharashtra Assembly Session Aaditya Thakceray: विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाने महाराष्ट्राचे परम पूज्य युवराज असा बॅनर झळकावला.

विधीमंडळ अधिवेशन सुरु झाल्यानंतर, महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेविरोधात घोषणाबाजी सुरु केली. बुधवारी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काॅंग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात बाचाबाची झाली होती.

( हेही वाचा: शाळांनी पालकांना स्कूल बससाठी सक्ती केल्यास होणार कारवाई )

आदित्य यांच्याविरोधात कोणत्या घोषणा?

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. बॅनरवर शिंदे गटाने महाराष्ट्राचे परम पुज्य युवराज असा बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष 2014 मध्ये 151 चा हट्ट करत युती बुडवली. 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा त्या बॅनरमध्ये होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.