सरकारला मदत करणाऱ्या आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंची धमकी

ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकणारच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

145

कालपासून लोकांचा संताप दिसतोय, त्याची संपूर्ण महाराष्ट्रात ठिणगी पेटलेली आहे. महाराष्ट्रात मिंध्येचे सरकार बसले आहे, काल मिंध्येंच्या टोळीने हल्ला केला, त्याची विचारणा करण्यासाठी उद्धव ठाकरे आले तेव्हा ठाण्याचे पोलीस आयुक्त पळून गेले होते. एका महिलेच्या पोटात लाथा मारल्या जातात, जणू काही मोगलाई आली आहे का? हे सरकार काही तासांचे सरकार आहे, हे पडल्यावर सगळ्यांचे मोजमाप काढा. कोण आयपीएस, आयएएस अधिकारी असतील त्यांना आजच सांगतोय सरकार आल्यावर तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार आदित्य ठाकरे यांना दिला.

सुसंस्कृत ठाणे म्हणून ओळखत होती, त्या ठाण्याला बदनाम केले

महिलांना शिवीगाळ करायची, त्यांना लाथा बुक्क्या मारायच्या आणि स्टाईल मारायची मोर्चा काढला, तर अटी शर्थी लावतात, काय बोलायचे नाही का? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे कौतुक करायला आलो आहे. मी ठाण्यात लढतो तेथून जिंकून दाखवणार, ठाणेकर मला स्वीकारणार, असेही आव्हान त्यांनी दिले. सुसंस्कृत ठाणे म्हणून ओळखत होती, त्या ठाण्याला एका दिवसात बदनाम केले. ठाण्यात मारहाण झाली तरी मुख्यमंत्री यावर एक शब्द बोलले नाही. त्या महिलेला मारहाण होते, गुन्हा त्याच महिलेवर होत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.