Adity Thackeray : आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक; काय आहे नेमके प्रकरण?

151

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेकविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली.

विधानसभेत मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. मंत्री अभ्यास करुन येत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्यावर कोणी आईच्या पोटातून हुशार होऊन येत नसल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले. या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरुन उठून शांत केले.

(हेही वाचा Gyanvapi : ज्ञानवापीचे वैज्ञानिक सर्वेक्षण अटी शर्थींसह करण्याचे न्यायालयाचे आदेश)

सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचे खातेवाटप होते. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. पण आता प्रत्येक दिवशी खातेवाटप होते. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांची यादी मी काल सभागृहात वाचून दाखवली. त्यामुळे ह्या प्रश्नाच चर्चा नको.

ठाकरेंवर पलटवार करत गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे फार अभ्यास करुन आले आहेत. मला माहित आहे. ऐनवेळी सर्व प्रश्न आले. यावेळी आदित्य ठाकरे मध्ये हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, कुणी आईच्या पोटातून हुशार होवून जन्माला येत नाही. तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहित असतील. या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना शांत केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.