Aditya Thackeray : मित्र कोण आणि शत्रू कोण?

71
Aditya Thackeray : मित्र कोण आणि शत्रू कोण?
Aditya Thackeray : मित्र कोण आणि शत्रू कोण?
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

एका वाहिनीवरील ‘अजेंडा महाराष्ट्राचा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत. यंदा मोठ्या तयारीने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मागच्या वेळी ते हरणार नाहीत याची विशेष काळजी घेतली गेली होती. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची निवड करण्यात आली. आपला पुतण्या जिंकावा म्हणून राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिला नव्हता. पण यावेळी लढत कठीण होणार आहे. कारण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात मोठे आव्हान असणार आहे. ते कशाप्रकारे या आव्हानांना सामोरे जातात हे पाहावे लागणार आहे.

ही मुलाखत अशा कारणांसाठी महत्त्वाची आहे. कारण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) नातू आहेत आणि त्यांच्या आजोबांनी शिवसेनेची स्थापना केली होती व शिवसेना हा पक्ष कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून राजकारण करत आला आहे. भाजपा हा शिवसेनेचे जुना साथीदार. वर म्हटल्याप्रमाणे या मुलाखतीत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अनेक मोठी विधाने केली असली तरी एक विधान हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की ‘गेली ५ वर्षे आम्हाला चांगले मित्र भेटले.’ हे वाक्य अतिशय गंभीर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांना जे शत्रू वाटत होते ते आदित्य व उद्धव ठाकरेंना मित्र वाटतात आणि जे मित्र वाटत होते ते ह्यांना शत्रू वाटतात.

(हेही वाचा – Urdu Teachers Association : उर्दू शाळेत नव्या गणवेशाला विरोध, उर्दू शिक्षक संघटनेचा मनमानी कारभार)

बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्र प्रथम या मार्गावरून चालत होते म्हणून त्यांचे राजकीय मित्र किंवा विरोधक हे देशाचे हित या आधारावर ठरत होते. शरद पवार हे बाळासाहेबांचे वैयक्तिक मित्र होते पण बाळासाहेबांनी कधीही पवारांशी युती किंवा आघाडी केली नाही. पवारांशी चांगली वैयक्तिक मैत्री ठेवून राजकारणाच्या रिंगणात मात्र त्यांनी पवारांना विरोधच केला. आज आदित्य ठाकरे ज्या मैत्रीबद्दल बोलत आहेत, ती राजकीय मैत्री आहे. सावरकर म्हणाले होते की, राजकारणात कुणी शत्रू नसतं, विरोधक असतात. पण आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ज्या मित्रांचा उल्लेख करत आहेत, त्या मित्रांनी नेहमीच सावरकरांचा द्वेष केला आहे, आजही करत आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे सावरकरांचे शत्रू आहेत, ते आपले म्हणजे हिंदूंचे शत्रू आहेत. कारण सावरकर हे राम, कृष्ण, छत्रपती शिवराय यांची परंपरा चालवत होते. आदित्य ठाकरे यांचे विद्यमान मित्र ही परंपरा नाकारतात. आदित्य यांचे वैयक्तिक कुणाशी कसे संबंध आहेत, हा भाग वेगळा. पण राजकीय मित्र कसा निवडायचा हे बाळासाहेबांकडून शिकलं पाहिजे. कारण त्यात वैयक्तिक स्वार्थ नसून राष्ट्रीय हित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठाकरे स्वतःला आजही हिंदुत्ववादी म्हणवून घेतात त्यामुळे राजकीय मित्र हा हिंदुत्ववादीच हवा. जर तो हिंदुत्वाचा विरोधी असेल तर तुम्ही बाळासाहेबांचे संस्कार विसारलात की काय अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होते. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेले हे विधान अतिशय महत्वाचे आणि मार्गदर्शक ठरणार आहे. कारण या विधानामुळे हिंदुत्ववादी मतदारांना कळले आहे की, आपले मित्र कोण आहेत आणि विरोधक कोण आहेत!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.