राज्यात जून महिन्यापर्यंत वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरचे प्रकल्प मुंबईत येणार असे अंतिम झाले होते, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व चर्चा झाली होती, मात्र अचानक १.५४ लाख कोटींचे हे प्रकल्प गुजरातला गेले, असा आरोप युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला.
गुजरातला जमले महाराष्ट्राला का नाही?
मागील वर्षी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई हे जेव्हा दावोसला वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या बैठकीला गेले होते, तेव्हा वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी त्यांचा उद्योग महाराष्ट्रात आणणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा या उद्योगासाठी तळेगाव येथे जमीन देण्याचेही ठरले होते. केवळ कागदोपत्री काम बाकी होते, असे असताना सरकार बदलताच हे उद्योग थेट गुजरातला कसे गेले, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचे दु:ख नाही. पण ही कंपनी ९५ टक्के राज्यात येणार होती. पण अचानक ती गुजरातला का गेली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या उद्योगाच्या संबंधी १६० इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून ७० हजार रोजगार निर्मिती होणार होती, असेही त्यांनी सांगितले आहे. गुजरात सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे अभिनंदन पण मग राज्यात जी यंत्रणा होती, तिने यात का काही केले नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा मढ, मार्वेतील अस्लम शेख यांच्या अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा )
Join Our WhatsApp Community