हिजाब प्रकरणी आदित्य ठाकरेंचे मोठे विधान! म्हणाले…

121

कर्नाटकात हिजाब परिधान करुन आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना तेथील महाविद्यालयाने बंदी घातली. याचे पडसाद देशभर उमटत आहेत. याबाबत काही राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. आता यावरुन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेले गणवेशच परिधान करावेत, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ठरवून दिलेले गणवेशच विद्यार्थ्यांनी परिधान करावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ आणि केवळ शिक्षणालाच महत्व देण्यात यावं. धार्मिक किंवा राजकीय विषयांपेक्षा फक्त शालेय विषयांकडेच लक्ष देण्यात यावं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबवर आग्रहीच! वाद पेटला, ड्रेस कोडची ऐशी तैशी )

काय आहे वाद?

कर्नाटक राज्यातील उड्डपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातही उमटणार पडसाद?

कर्नाटकातील या घटनेचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे. यादिवशी सर्व महिला बुरखा परिधान करतील, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

(हेही वाचाः कर्नाटकातील हिजाब प्रकरण पेटले, मुंबईतही पडसाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.