शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी, १५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यावर राजकीय पातळीवर टीकाटिपण्णी होत आहे. यावर भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आदित्य ठाकरे यांचे शुभमंगल व्हावे, सीतामाईंसारखी सुनबाई मिळावी, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
आदित्य ठाकरे हे अयोध्येत गेले आहेत, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मी देखील मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. तसेच प्रभू श्री रामचंद्राला प्रार्थना केली की, सीतामाईसारखीच सुनबाई आम्हाला मिळो, आदित्य ठाकरे यांची शुभमंगल होवो, कारण आदित्य ठाकरे हे माझ्याच मुलाच्या वयाचे आहे, असे खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
(हेही वाचा अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे योगी सरकारला पत्र लिहिणार)
आधी महाराष्ट्रातील हिंदूंचे रक्षण करा! – नितेश राणे
तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आधी महाराष्ट्रातील हिंदूंचे रक्षण करा आणि मग अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घ्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंना टोला हाणला. अयोध्येत जाऊन तुमची पापे धुतली जाणार नाही, आधी हिंदूंची घरे सुरक्षित करा आणि मग मोठमोठ्या आरत्या करा, असेही आमदार राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community