भाजपाची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक ( Nawab Malik) यांना दिलेल्या उमेदवारीबद्दल आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी ही वारंवार स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही, असा पुनरुच्चार मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी दि. २९ ऑक्टोबरला केला आहे.
सना मलिकांचे काय?
नवाब मलिक ( Nawab Malik) यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांना अणुशक्तीनगर मतदारसंघातून देण्यात आलेल्या महायुतीच्या उमेदवारीबाबत विचारले असता आमदार आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले, यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा माहिती समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही, असे ही शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले. ( Nawab Malik)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community