राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत; ॲड. Ashish Shelar यांचे विधान

37
राहुल गांधी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत; ॲड. Ashish Shelar यांचे विधान
  • प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षाला जोरदार फटका दिला आहे. मात्र, अद्यापही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरलेले नाहीत, अशी टीका भाजप नेते ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.

मतदारसंख्या वाढली, तर त्यात चूक काय?

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मतदारसंख्या वाढली तर त्यात चूक काय? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या नावांची गाळप झाली होती. त्यावेळी मतदार स्वतः ओरडत होते. मग राहुल गांधी, तुम्ही त्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांची नावे गायब करूनच जिंकलात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांचे वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबांसारखे आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Flower Festival : दीड लाख मुंबईकरांनी जाणून घेतली झाडाफुलांची माहिती; महापालिकेच्या पुष्पोत्सवाची मुंबईकरांना भुरळ)

शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्याचे प्रवक्ते का बनताय?

“देशातील यंत्रणा आणि व्यवस्थांबद्दल संशय निर्माण करणे हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. मग राहुल गांधी हे त्यांच्या अजेंड्याचे प्रवक्ते का बनत आहेत?” असा थेट आरोप शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

“राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचे जाहीर प्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. विधानसभेसाठी मतदारसंख्या वाढली, मग त्यांचीच नावे लोकसभेसाठी गायब करून तुम्ही निवडणूक जिंकली का?” असा सवाल त्यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांचा जीव ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार आणि कटकमिशनमध्ये अडकला”

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेतील ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार आणि कटकमिशनमध्ये अडकला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

(हेही वाचा – Indian Railway च्या विद्युतीकरणाला १०० वर्षे पूर्ण; कसा होता प्रवास, जाणून घ्या..)

“विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसमध्ये एकमत आहे का?”

“जर विरोधी पक्षनेते पद काँग्रेसने वडेट्टीवार यांना द्यायचे ठरवले असेल, तर आधी काँग्रेसमध्ये एकमत आहे का?” असा खोचक प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या विधानांना आत्मपराभवाचे प्रदर्शन असे संबोधले. तसेच, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मतदारसंख्येच्या वाढीवर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादांवरही त्यांनी निशाणा साधला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.