विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आणि स्थानिक उमेदवारांकडून कार्य अहवाल प्रसिद्ध (Adv. Ashish Shelar work report) केले जात आहे. अशातच वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार तथा मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी आपला कार्य अहवाल प्रसिद्ध केला आहे. या कार्य अहवालाचे शीर्षक ‘जे केले ते जनतेसाठी’ असे आहे.
शेलारांच्या कार्य अहवालात नक्की काय?
अॅड. आशिष शेलारांच्या (Adv. Ashish Shelar) या कार्य अहवालात वांद्रे पश्चिम मतदारसंघात त्यांनी पर्यावरण, आरोग्य, नागरी सुविधा, सुशोभिकरण, रेल्वे स्थानकातील सुधारणा, प्रोमोनाड यासंदर्भात केलेल्या अनेक विकासकामांच्या माहितीचा समावेश आहे. हा कार्य अहवाल २०१९- २०२४ या वर्षातील शेलारांनी आमदार म्हणून मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा धावता आढावा घेण्यात आला. (Adv. Ashish Shelar)
यामध्ये माहीम जंक्शन सुशोभिकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौदर्यींकरण, बॉलिवूड थीम मेट्रो लाइन 2B खाली सुशोभिकरण, खार स्मशानभूमीचा पुनर्विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खारमधील संविधान मंदिर, अलिबाग- रोहा बससेवा, सायबर क्राईम सेंटर, सांडपणी प्रक्रिया प्रकल्प, वांद्रे रिक्लेमेशन यांसारख्या कामासाठी शेलारांनी घेतलेला पुढाकार अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी विधिमंडळाच्या १२ अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांची माहिती आणि १२ अधिवेशनातील १३१ दिवसांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. (Adv. Ashish Shelar)
Join Our WhatsApp Community