वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे जयश्री पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. तर गुणरत्न सदावर्तेंना सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी जयश्री पाटलांवर गुन्हा दाखल
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भडकविण्यात सहभाग असणे आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपात जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलन केले होते, तेव्हापासून गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सदावर्तेंच्या घराच्या गच्चीत जी मिटींग झाली त्या मिटींगमध्ये देखील जयश्री पाटील उपस्थित होत्या असे सांगितले जात आहे तर एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेण्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती. या प्रकरणानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात जय़श्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
(हेही वाचा – सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता कोण घेणार ताबा?)
न्यायालयाकडून तुर्तास दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या डावपेचात सहभागी असल्याप्रकरणी आणि पैसे घेतल्या प्रकरणी हा जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर जयश्री पाटील या काही काळासाठी फरार असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी थेट न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणात आता न्यायालयाने त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे.
Join Our WhatsApp Community