फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब! स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? आरोपांवर प्रवीण चव्हाण काय म्हणाले?

140

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंगळवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत एकच खळबळ उडवून दिली. 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन असलेले 29 वेगवेगळे पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपावर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना आपली बाजू मांडली आहे.

काय म्हणाले प्रवीण चव्हाण?

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपा कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. भाजपने केवळ एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. व्हिडीओची मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओ आणि आवाज मॅनिप्युलेट केले आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भात चौकशी केल्यावर सत्य समोर येईल, असे म्हणत त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या सोबतच मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असेही प्रवीण चव्हाण म्हणालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माझ्या कार्यालयात तेसज मोरे याचा जामीन अर्ज होता. त्याचा सहभाग यात असण्याची दाट शक्यता आहे. ते घड्याळ त्यानेच इथे आणलं होतं. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. त्याने एसी बसवून देण्याचे म्हटले होते, स्मार्ट टीव्ही लावण्याचे म्हटले होते मी नकार दिला होता. त्याचा अटकपूर्व जामीन मी केला होता आणि त्याची फी सुद्धा अद्याप बाकी आहे.

(हेही वाचा – मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर! )

चव्हाण यांनी पुढे असेही सांगितले की, तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामिन मिळवण्यासाठी माझ्याकडे येत होता. तेजस मोरेला अनेकांची साथ आहे. मी चालवत असलेल्या केसेसमधे जे आरोपी तुरुंगात आहेत त्यांचीही त्याला साथ आहे. मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठे साहेब उल्लेख केला आहे आणि तो उल्लेख शरद पवारांच्या नावाचा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस केला आहे. यावर प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं, त्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.