शिंदे गटाच्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर

82

शिवसेनेतून फुटलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ जणांच्या गटाचे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवण्यात आले असले तरी या सर्व आमदारांच्या गटाला विधिमंडळातील गटाला मान्यता मिळावी म्हणून शिंदे गटाची जोरदार तयारी चालू आहेत. यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेल्या आमदारांचे समर्थन दिल्याचे व्हिडिओ आणि त्यांच्याकडून वैयक्तिक प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले आहे.

हे आमदार प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी पाठिंबा देणार?

एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ३८ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केल्यानंतर शिवसेनेने आमच्याकडे सध्या १८ आमदार असून शिंदे गटाकडे असलेल्यां काही आमदार हे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेनेला पाठिंबा देतील असा दावा केला आहे. मात्र, शिंदे गटाने सर्व आमदारांची विशेष काळजी घेतली असून सर्व आमदार स्वेच्छेने तिथे गेल्याचे वारंवार प्रसारित केलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील नवीन गट स्थापन करण्यात आला आहे. या नवीन गटात सामील झालेल्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्ष यांना पाठवले आहे.

… त्यानंतरच निर्णय घेतला जाणार

विधानसभा उपाध्यक्ष यांनी या सर्व स्वाक्षरीचे पत्र पडताळणी करून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे कळवले आहे. अल्प मतात आलेल्या सरकार बरखास्त झाल्यास किंवा त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यास विद्यमान सरकारच्या विरोधात होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आमदारांकडून वैयक्तिक प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलेले आहे. तसेच या प्रतिज्ञापत्र सोबत त्यांचे व्हिडीओही बनवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे प्रतिज्ञापत्र आमदारांनी लिहून असून आपण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटात सामील झाल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाला मोठा झटका! गटनेतेपदी अजय चौधरी तर प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड)

आमदारांचे हे व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवले जाणार आहेत. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष यांनी या सर्व बाबींची चाचणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतील. त्यामुळे नवीन सरकार स्थापनेच्या वेळी विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा वेळेला होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या वेळी शिंदे यांच्या सह त्यांचे आमदार उपस्थित राहतील. ही फ्लोअर टेस्ट विधिमंडळ किंवा राज्यपाल यांच्या उपस्थितीत होऊ शकते. जर महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोविड बाधित असतील तर याचा अतिरिक्त कार्यभार गोवा राज्यपाल यांच्याकडे असल्याने तिथेही हे आमदार आपल्या गटाची ओळख देऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.