अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानात अडकलेल्या जगभरातील देशांच्या नागरिकांना त्या त्या देशांनी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्याप्रमाणे अमेरिकेने आधीच सर्वोतोपरी प्रयत्न करून अमेरिकेतील नागरिकांना आणि दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे अमेरिकेत आणले. त्यानंतर भारताने कालपासून तिथे अडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळीच भारतीय वायुसेनेच्या सी-१७ विमानाने १४० भारतीयांना भारतात आणले आहे. त्याच बरोबर अफगाण नागरिकांनाही भारतात तात्पुरता आश्रय देण्यासाठी सहा महिन्यांकरता ऑनलाईन व्हिसा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गृह मंत्रालयाने अफगाण नागरिकांना भारतात लवकरात लवकर प्रवेश करता यावे, यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी “ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा” तयार केली आहे. हा सहा महिन्यांच्या कालावधीचा व्हिसा असणार आहे.
१४० भारतीय मायदेशी परतले! जवान अजूनही अडकले!
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यावर तिथे अडकलेल्या जगभरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थितीत निर्माण झाला आहे. नंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानच्या परिस्थितीकडे लागले आहे. भारतासह इतरही अनेक देश आपापल्या देशातील नागरिकांना तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधल्या भारतीय राजदूतांना तात्काळ बाहेर भारतात परत आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. भारतीय वायूसेनेचे C-17 हे विमान काबूलहून भारताकडे रवाना झाले आहे. भारताचे हे विमान अमेरिकी सैनिकांच्या संरक्षणात बाहेर काढण्यात आले. या विमानात जवळपास १४० भारतीय आहेत. यात भारतीय राजदूत आर.टंडन यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना काबूलमधून परत भारतात आणण्यात येत आहे. त्याचबरोबर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनाही लवकरात लवकर भारतात परत आणण्यात येत आहे.
Indian Air Force’s C-17 Globemaster lands in Kabul to evacuate Indians including stranded embassy staff. #Garud onboard to provide security.
जय हिंद!💪🇮🇳Hatts off our brave, courageous, IAF officers.
” Touch the Sky with Glory”
Jai Hind! 🇮🇳 @IAF_MCC @narendramodi @bvinay26 pic.twitter.com/O7GbhlCk5T— Mohit Sharma🇮🇳 (@iamSuroliya) August 17, 2021
(हेही वाचा : अफगाणिस्तानचा खरा गुन्हेगार कोण? जो बायडेन कि अशरफ घनी?)
अफगाण नागरिकांचीही केली सोय!
काबूलमध्ये जवळपास ५०० भारतीय अडकले आहेत. भारत सरकारच्या सी-१९ या विमानाच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले जात आहे. सोमवारी साधारण ४६ भारतीय देशात परतले. तर बाकीच्यांना मंगळवारी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारताचे ३०० ते ४०० सुरक्षा जवानही अजून अफगाणिस्तानमध्ये आहेत. गृह मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन व्हिसा तरतुदींचा आढावा घेतला. अफगाण नागरिकांना भारतात लवकरात लवकर प्रवेश करता यावा यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन श्रेणी “ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसा” तयार केली आहे. हा व्हिसा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community