अफगाण मुस्लिम बनले शरणार्थी! भारतीय मुस्लिम होतायेत टीकेचे धनी!

165

सध्या जगभरात अफगाणिस्तानात सुरु असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांच्या अराजकतेची चर्चा सुरु आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानची जबाबदारी सोडून देताच अवघ्या २ महिन्यांत तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतले. रविवारी, तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा कसून राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. त्यानंतर रातोरात अफगाणिस्तानातील नागरिकांनी काबुल विमानतळ गाठून देश सोडण्यासाठी पळापळ सुरु केली. अशा वेळी भारतात अफगाणिस्तानातील मुस्लिमांना आश्रय देण्यात यावा, अशी मागणी तेथील मुसलमान नागरिक करत आहेत. त्यावरून भारतीय मुसलमान सोशल मीडियात ट्रॉल होत आहेत, जर अफगाण मुस्लिम नागरिकांना भारतात सुरक्षित वाटते, पण भारतीय मुसलमानांना भारतात सुरक्षित का वाटत नाही?, अशा प्रक्रारे भारतीय मुसलमान सोशल मीडियात ट्रॉल होत आहेत.

(हेही वाचा : तालिबानची दहशत: अमेरिकन म्हणतायेत ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’!)

पॅलेस्टिनींसाठी ओरडणारे भारतीय मुसलमान अफगाणबाबत गप्प का? 

मागील ३ महिन्यांपासून जेव्हापासून अफगाणिस्तानात अमेरिकेने त्यांचे ३ हजार सैन्य मागे घेतले, तेव्हापासूनच अफगाणिस्तानातील नागरिकांनी भारताकडे व्हिसासाठी अर्ज केला आहे, ही संख्या ४० ते ४५ हजार इतकी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील शरणार्थींचा मोठा प्रश्न अचानक निर्माण झाला आहे.

अफगाणिस्तानची थेट सीमा इराण आणि पाकिस्तानशी जोडलेली आहे, त्यांच्याकडे अफगाणिस्तानमधील शरणार्थी थेट घुसखोरी करतील, मात्र भारताची सीमा थेट अफगाणिस्तानशी जोडली गेली नाही, तरी अधिकृतपणे तेथील शरणार्थी भारतात येत आहेत. मात्र सध्या जे तालिबानी दहशतवादी अराजक माजवत आहेत, त्यावर भारतीय मुस्लिम का टीका करत नाहीत?, अशी चर्चा सोशल मीडियात सुरु झाली आहे. पॅलेस्टिनींवर हल्ला होत असताना कांगावा करणारे भारतीय मुसलमान मात्र तालिबानींबाबत मूग गिळून का गप्प आहेत? तालिबानींच्या विरोधात उघडपणे न बोलणारे भारतीय मुसलमान सोशल मीडियात ट्रॉल होत आहेत.

https://twitter.com/AshishK93328754/status/1427170520051503104?s=20

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.