हुश्श! तालिबान्यांशी लढायला कुणीतरी आला…कोण आहे ‘तो’? 

अमृल्ला सालेह यांनी १० हजारांची फौज जमवली आहे आणि दक्षिण काबुल तालिबान्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तयारी केली आहे.

अमेरिकेच्या छत्र छायेखाली राहून अलिशान जीवन जगणारे अफगाणिस्तानाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे तालिबान्यांचा हिंसाचार पाहून घाबरले आणि अफगाणी जनतेला वाऱ्यावर सोडून धनसंपत्ती घेऊन पळाले. अवघ्या जगाने हा पळपुटेपणा पहिला.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या प्रकरणी टीका केली. त्यानंतर तालीबान्यांनी अफगाणिस्तानाची सत्ता काबीज केली आहे. या देशात पुन्हा हिंसाचार सुरु झाला आहे. अशा वेळी तालिबान्यांशी लढायला त्याच भूमीतला कुणीतरी नेता तयार झाला आहे. त्याने अफगाण जनतेला ‘यापुढे मी देशाचे नेतृत्व करणार असून तालिबान्यांशी दोन-हात करणार आहे, मला पाठिंबा द्या’, असे आवाहन केले आहे.

(हेही वाचा : आता चर्चा शरिया कायद्याची…नेटकऱ्यांना का आठवले हमीद अन्सारी?)

अमृल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर केले!  

अफगाणिस्तानचे उप राष्ट्रपती अमृल्ला सालेह यांनी अफगाणिस्तानचे उप राष्ट्रपती म्हणून स्वतःला घोषित केले. तसेच यापुढे आपण देशाचे नेतृत्व करणार आहे. सालेह यांनी तात्काळ दक्षिण काबुल येथील पंजशीर खोऱ्यातील चारीकर जिल्हा ताब्यात घेतला आहे. सालेह यांनी त्यांना अफगाणिस्तान जनतेने पाठिंबा देण्यासाठी आवाहन केले आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे पळून गेल्यामुळे नियमाने मी राष्ट्राध्यक्ष झालो आहे, या परिस्थितीतही मी देशाचे नेतृत्व करायला तयार आहे. अफगाण जनतेने मला पाठिंबा द्यावा, असे सालेह यांनी म्हटले आहे.

१० हजारांची फौज घेऊन लढायला तयार! 

सालेह यांनी १० हजारांची फौज जमवली आहे आणि दक्षिण काबुल तालिबान्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तयारी केली आहे. कारण अफगाण सैन्यांचे जनरल अब्दुल रशीद दोस्तम यांनी दहा हजार सैनिकांना घेऊन ते तालिबानविरुद्ध लढण्यासाठी पंजशीर दिशेने पुढे जात अमृल्ला सालेह यांना  भेटणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here