दिशा सालियन प्रकरणी राणे पिता-पुत्र पुरावे देणार का ?

97

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांची तब्बल 9 तास पोलिसांनी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना सोडून दिले. त्यानंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. माझ्या जबाबात मी सुरुवातीपासून घडलं ती माहिती आणि आम्ही जे बोलत होतो ते सांगितले. एवढेच नाही तर दिशा सालियानची 8 जून आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आला, असा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला. तुम्ही सुशांत आणि दिशाच्या केसबाबत बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. मी बोललो मी एक लोकप्रतिनिधी आहे, का बोलू नको? तर तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असे काही करु नका. मात्र, माझे हे वाक्य माझ्या जबाबातून वगळण्यात आले असल्याचे नारायण राणेंनी म्हटले आहे.

( हेही वाचा : पंतप्रधानांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, मेट्रोमध्ये बसून प्रवास… )

काय म्हणाले नारायण राणे?

मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. कलम 41 (अ)ची नोटीस आली होती. दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला बोलावण्यात आले आहे असे नमूद करण्यात आले होते. दिशा सालियनचे खरे आरोपी पकडले पाहिजे. तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली हे आम्ही वारंवार सांगत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. दिशा सालियनसाठी न्याय मिळवण्याची मागणी असताना बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलीस ठाण्याला केली गेली. त्यानंतर 9 तास आम्हाला बसवून ठेवले होते.

अमित शहांना फोन केल्यावर सोडले

आम्ही वारंवार सांगतोय, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहेत. कुणावर अन्याय होत असेल तर त्यासाठी लढण्याचा आम्हाला अधिकार आहे. दिशा सालियनवर अन्याय झाला. तिला न्याय मिळवून देण्याची आमची मागणी असताना आमच्यावर केस दाखल करण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. आम्ही या प्रकरणात शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी अमित शहांना फोन केला, त्यानंतर आम्हाला सोडले आहे असं राणे म्हणाले. कोणावरही अन्याय होणार असेल तर अन्यायाविरोधात आवाज उठवणारच. आमच्या आयुष्यातील पाच ते दहा तास घेतले म्हणजे फार काही मिळवले असे होत नाही. आम्ही दिशा सालियन आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिथे संधी मिळेल तिथे न्यायासाठी बोलू. दिशाची केस बंद करण्यात येत आहे. ज्या लोकांनी अत्याचार केला त्याला सरकार संरक्षण देत आहे असा आरोपही राणे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.