शिवसेनेमधून ४० आमदारांना फोडून भाजपाच्या समर्थनाने एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि आपण सरकारमध्ये न राहता बाहेरून सरकारला सहकार्य करू, अशी घोषणा स्वतः भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, ३० जून रोजी केली. त्यानंतर अवघ्या २ तासांतच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील, असे ट्विट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट आला आहे.
काय म्हणाले अमित शहा?
देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रति खरी निष्ठा व सेवाभावाचा परिचय मिळवून दिला आहे. त्यासाठी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करत आहे.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
त्यानंतर ‘हा पक्षाचा आदेश आहे तो आदेश आपण पाळत आहे, असे सांगत फडणवीस यांनी हा निर्णय मान्य केला. त्यामुळे राजभवनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेत असतानाच त्यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांनीही शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा फडणवीस यांना फोन करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यासाठी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.
Join Our WhatsApp Community