जमीन घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या हेमंत सोरेन यांना EDच्या कारवाईमुळे दोन दिवसांत मुख्यमंत्री पद सोडावे लागले, त्यानंतर ED ने त्यांना अटक केली. आता सर्वांचे लक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लागले आहे. त्यांना ED ने गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी ५ समन्स पाठवले आहे.
केजरीवाल यांना मद्य धोरण अडचणीत आणणार
हेमंत सोरेन यांना ED ने अनेक समन्स पाठवले होते, पण हेमंत सोरेन ED च्या चौकशीला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अखेर त्यांना अटक करण्यात आली. त्याच पद्धतीने मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी ED ५ वेळा समन्स बजावले आहेत. परंतु केजरीवाल चौकशीला हजर राहत नाहीत. EDने केजरीवाल यांना 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवले होते. चौथ्या समन्सवर केजरीवाल म्हणाले होते की, भाजपला मला अटक करायचे आहे, जेणेकरून मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करू नये.
(हेही वाचा Interim Budget : अंतरिम अर्थसंकल्पात काय महाग झाले आणि काय स्वस्त?)
…तर ED अजामीनपात्र अटक वॉरंट जरी करू शकते
दरम्यान मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे खासदार संजय सिंह सध्या गजाआड आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. केजरीवाल हे EDने वारंवार समन्स बजावूनही त्यावर गैरहजर राहिल्याबद्दल ED त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करू शकते. त्यानंतरही ते हजर न झाल्यास कलम 45 अन्वये अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community