अभी तो असली लढाई मुंबई में होगी! फडणवीसांचा नारा

114

गुरूवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. चार राज्यात भाजपचं सरकार स्थापन होणार असून गोव्यात तीन अपक्षांच्या मदतीने भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. फडणवीसांनी मुंबईत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी ते म्हणाले, कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचे नाही, विजयाने नम्र व्हायचे आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी, असे म्हणत त्यांना महापालिका निवडणुकीचा नारा दिला.

… तोपर्यंत दम घेता येणार नाही

लढाई अजून संपलेली नाही. खरी लढाई मुंबईत होईल, असे सांगत फडणवीसांनी असेही म्हटले की, मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. मुंबई महानगर पालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सज्ज राहावे, असे पुढे फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – आठवले का म्हणाले, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही?)

विजय मिळवण्यात सेनेचा मोठा हात पण…

विधानसभा निवडणुकीत चार राज्यात भाजपचं कमळ फुलल्याने त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ते मुंबईत उपस्थितीत होते. गोव्यातील विजयामध्ये महाराष्ट्रातील सेनेचा मोठा वाटा आहे, असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर खोचक टोला देखील लगावला आहे. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानेन. हा विजय मिळवण्यामध्ये महाराष्ट्राच्या सेनेचा फार मोठा हात आहे. पण ही सेना म्हणजे भाजपाची सेना. दुसऱ्या सेनेचे तिथे काय झाले हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. ते त्या ठिकाणी येऊन गर्जना करत होते की आम्ही भाजपाला हरवू. त्यांची लढाई भाजपाशी नसून नोटाशी होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज नोटापेक्षाही कमी आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.