अयोध्या तो झांकी है…अयोध्येनंतर काशी आता मथुरेचाही वाद न्यायालयात!

177

अयोध्या तो झांकी है, कांशी-मथुरा बाकी है, ही घोषणा भाजपा वास्तवात उतरवत आहे, असे चित्र आहे. कारण अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ज्ञानव्यापी मशीदकडे खोदकाम सुरु करून त्यावर मंदिर असल्याचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु झाले असताना आता मथुरा राजकारणाचे नवं केंद्र बनले आहे. मथुरेतील शाही ईदगाह मशिदीची जागा श्रीकृष्ण जन्मभूमी देवस्थान ट्रस्टला द्या अशी मागणी याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांनी केली आहे.

काय आहे मागणी?

याचिकाकर्ते श्रीकृष्ण विराजमान यांच्या मालकीची एकूण 13.37 एकर जमीन आहे. यापैकी 11 एकरात श्रीकृष्णाचे जन्मस्थान मंदिर आहे. तर 2.37 एकर जमिनीवर शाही ईदगाह मशिद आहे. ही 2.37 एकर जमीन मोकळी करून श्रीकृष्ण जन्मस्थानाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली असून याप्रकरणी येत्या 1 जुलैला सुनावणी होणार आहे. काशी आणि मथुरेचा वाद हा जवळपास अयोध्येसारखाच आहे. त्यामुळे  चांगलाच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा ज्ञानव्यापी मंदिराप्रमाणे मुस्लिम आक्रमणाची  पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरालाही बसलेली झळ, पण… )

काय आहे मथुरेचा वाद?

काशी आणि मथुरेत औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडून मशिदी बनवल्या, असा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबाने 1670 मध्ये मथुरेतील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तोडले आणि त्याठिकाणी ईदगाह मशीद बांधण्यात आली, असा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. ब्रिटिशांनी 1815 साली बनारसचे राजे पटनीमल यांना लिलावात ही जमीन विकली. मात्र 1920 ते 1930 च्या दशकात मुस्लिमांनी लिलावात विकलेल्या जमिनीत ईदगाह मशीद ट्रस्टचा हिस्सा असल्याचा दावा केला. तर ज्या भागात ईदगाह मशीद आहे तिथे कंसाचा तुरुंग होता,असा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. त्यामुळे या जागेचा मालकी हक्क मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.