भाजपाच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर Ravindra Chavan म्हणाले…

46
भाजपाच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर Ravindra Chavan म्हणाले...
भाजपाच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर Ravindra Chavan म्हणाले...

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो. सर्वांनी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. माझा हा सन्मान आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगतप्रकाश नड्डाजी यांनी माझ्यावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. आजच शिर्डी येथे भाजपा महाविजयी अधिवेशनाचीही सुरुवात झाली आहे. ” असं रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी ट्विट करत आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्रातील पक्ष संघटना आणखी बळकट करण्यात श्री. रवींद्र चव्हाण यशस्वी होतील या शुभेच्छा..!” असं ते म्हणाले आहेत.

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.