संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोप झालेले आणि त्यामुळे अटकेची टांगती तलवार असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यामुळे नितेश राणे तब्बल दोन आठवड्यानंतर प्रकटले आहेत. नितेश राणे थेट सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत गेले आणि विजयी उमेदवारांचा सत्कार केला. मनीष दळवी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
भाजपचा विजय तरी नितेश राणे नव्हते…
शिवसेनेला धक्का देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवला. त्यानंतर गुरुवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. नितेश राणे यांनी थेट जिल्हा बँकेत दाखल होत अध्यक्ष, उपाध्यांचे अभिनंदन केले. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातला राणेंचा विजय चांगलाच चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयात नितेश राणेंची भूमिका निर्णायक राहिली, मात्र संतोष परब प्रकरणाचा ससेमिरा मागे लागल्यानंतर राणे कुठेच दिसले नाही. बँकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरी तो साजरा करण्यासाठी मात्र नितेश राणे कुठेच नव्हते, त्यानंतर आज ते थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले.
(हेही अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)
उच्च न्यायालयाच्या दिलासामुळे राणे
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठीउच्च न्यायालयात धाव घेतली आहे, 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. सत्र न्यायलयाने तीन दिवसांच्या दीर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे, त्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले आहे, राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता उच्च न्यायालयात तर दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Join Our WhatsApp Community