एनसीबीचे विभागप्रमुख समीर वानखेडे यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोशल मीडियातून केली. त्याविरोधात समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांनी वानखेडे यांची न्यायालयात हमी देऊनही बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागितली.
१० डिसेंबरपर्यंत खुलासा करण्याचा दिलेला आदेश
नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यातील मागील सुनावणीत अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र तरीही मलिक यांनी बदनामीकारक वक्तव्य केले. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने ‘तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये’, अशी विचारणा करत नवाब मलिक यांना खडसावले होते. तसेच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते. नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.
(हेही वाचा विधान परिषदेच्या ‘त्या’ १७ जागा भाजपचे बिघडवणार गणित?)
Join Our WhatsApp Community