मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनिल परब थेट ईडीच्या कार्यालयात!

परिवहन मंत्री अनिल परब यांची साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंगळवार, २१ जून रोजी तब्बल ११ तास ईडीने चौकशी केल्यावर बुधवारी, २२ जून रोजी परब मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले, या बैठकीनंतर परब हे थेट ईडीच्या कार्यालयात हजर राहिले.

परबांची ११ तास केलेली चौकशी 

एका बाजूला शिवसेनेत भगदाड पडत आहे, शिवसेना सगळी फुटत असताना दुसरीकडे शिवसेनेचे चाणक्य म्हणून नावारूपाला येणारे अनिल परब मात्र ईडीच्या चौकशीला सामोरे जात होते. ज्या दिवशी मंगळवारी, २१ जून रोजी मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे ४० आमदार घेऊन महाराष्ट्र बाहेर गेले होते, त्यामुळे शिवसेनेत तणाव निर्माण झाला असताना दुसरीकडे अनिल परब यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती, तब्बल ११ तास ही चौकशी झाली.

अटक होण्याची शक्यता 

त्यानंतर ईडीने परब यांना दुसऱ्या दिवशी बुधवारी, २२ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले. त्यामुळे अनिल परब हे सकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिले आणि बैठक संपवून परब थेट ईडीच्या कार्यालयात चौकशीला गेले. आज परब यांची चौकशी होऊन जर त्यांना अटक झाली तर मात्र शिवसेनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here