प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर आता ईडीकडून देखील कारवाईची नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्यांना पुण्यात असणारी मालमत्ता रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेची किंमत साधारण ४ कोटी ७३ लाख इतकी आहे. दरम्यान, सीबीआयकडून अविनाश भोसले यांना पहिलेच अटक करण्यात आली असून त्यांना ८ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता ईडीने देखील त्यांना नोटीस बजावली आहे.
(हेही वाचा -भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटीसह ७ जण ताब्यात)
मनी लाँड्रिंग प्रकरणाशिवाय ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती तर येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकऱणी त्यांचा सीबीआय़कडून तपास सुरू असून ८ जून पर्यंत अविनाश भोसले हे सीबीआय कोठडीत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
DHFL-Yes Bank fraud case | Avinash Bhosale, promoter of the ABIL group of companies remanded to police custody till 8th June
— ANI (@ANI) May 31, 2022
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसचे महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे असून, ते एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. तसेच चे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राज्यातील बड्या राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.
Join Our WhatsApp Community