काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या वाढत आहे, हे नाराज थेट पक्ष श्रेष्टींवर टीका करत आहेत आणि पक्षातून बाहेर पडत आहेत. आधीच काँग्रेसमध्ये नाराजांचा G23 ग्रुप तयार झाला आहे. त्यांच्याकडून काँग्रेस पक्ष नेतृत्वावर टीका टिपण्णी केली जात आहे. गुलाब नबी आझाद हे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर उघडपणे टीका केली. त्यापाठोपाठ आता राज बब्बर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत संकेत दिले आहेत.
काँग्रेसचे अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत
काँग्रेस नेता राज बब्बर यांनी भाजपा सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. पंतप्रधान जन धन योजनेचे ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांपर्यंत पैसे आणि मदतीविना पोहचलेली ही क्रांती आहे. यात सर्वाधिक खातेधारक महिला आहेत. अशीच योजना आपका पैसा आपके हाथ नावावर मनमोहन सरकारने सुरू केली होती सध्याच्या सरकारने खूप चांगले काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत पक्ष हायकमांडच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. विविध माध्यमातून काँग्रेस नेते त्यांची नाराजी बोलून दाखवत आहेत.
(हेही वाचा भारताची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल! लवकर जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार)
Join Our WhatsApp Community