विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र याचिकांवर निकाल देताना शिवसेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकाही आमदाराला अपात्र न ठरवता उबाठा गटाला कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळू नये, याचा चोख बंदोबस्त केला. त्याचबरोबर उबाठा गट सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा विचार करत असेल, तर त्या मुद्याची हवा अगोदरच काढून टाकली आहे.
अनपेक्षित धक्का
बुधवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एक ऐतिहासिक निर्णय देत शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निर्वाळा दिला. उबाठा गटातील १४ आमदार अपात्र ठरविले जातील, असे वाटले होते, मात्र दोन्ही बाजूच्या एकाही आमदाराला अपात्र न करून नार्वेकर यांनी अनपेक्षित धक्का दिला.
(हेही वाचा Uddhav Thackeray : ही तर मॅच फिक्सिंग; हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान; उद्धव ठाकरेंची टीका)
न्यायालयात दाद मागणेही कठीण
या अनपेक्षित निर्णयामुळे उबाठा गटाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आमदार अपात्र न केल्यामुळे उबाठा गटाला मराठी जनतेपुढे रडून सहानुभूती मिळवणे कठीण होऊन बसले आहे. कोणत्याही पक्षाच्या आमदाराला अपात्र न केल्याने ‘उबाठा’ला सर्वोच्च न्यायालयातही दाद मागणे कठीण होऊन बसले आहे.
याचिका sue-motu दाखल करून घ्यावी
अखेर निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयालाच मागणी केली की, त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर सू-मोटो (sue-motu) याचिका दाखल करून घ्यावी, अशी मागणी केली.
Join Our WhatsApp Community