राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. पहाटे सहा वाजल्यापासून ही छापेमारी सुरु आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरु आहे. मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त येताच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ठाकरे सरकारने फक्त घोटाळे केले
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 158 कोटी रुपयांचे पुरावे दिले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबले होते. परंतु शेवटी महाराष्ट्रतील जनतेला न्याय मिळाला आणि उद्धव ठाकरे यांची तर प्रचंड मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणे एवढेच या सरकारचे काम होते, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी )
हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. त्याची चौकशी सुरु झाली आहे. हिसाब तर घेऊनच राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करुन ठेवायची आहे, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community