रविवार, 2 जून रोजी, इंडी आघाडीच्या (Indi Alliance) शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाची भेट घेतली. त्यानंतर काही तासांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) चे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, संजय मयुख आणि ओम पाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. या बैठकीनंतर, पीयूष गोयल यांनी माध्यमांना संबोधित केले आणि आरोप केला की भारताच्या सक्षम निवडणूक प्रक्रियेची विश्वासाहर्ता कमी करण्यासाठी काँग्रेस आणि इंडी आघाडी वारंवार प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात आयोगाकडे आलो आहे.
पियुष गोयल यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, काँग्रेसने भारतीय लोकशाही व्यवस्थेवर हल्ला केला आहे. निवडणुका पूर्णपणे पारदर्शक आणि चांगल्या होत आहेत. विरोधी पक्ष भारताच्या विकासाला लक्ष्य करत आहेत. निर्णय आपल्या बाजूने आला तर सत्यमेव जयते म्हणतात, अन्यथा विरोध करतात. शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला चार महत्त्वाची पावले उचलण्याची विनंती केली आहे. गोयल यांच्या मते, या मागण्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
(हेही वाचा उत्तर प्रदेशात Love Jihad; हिंदू तरुणीशी जबरदस्तीने ‘निकाह’ करून मुंबईत केले धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार)
- मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला विहित प्रक्रियेच्या बारीकसारीक तपशीलांची पूर्ण माहिती असली पाहिजे आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
- मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना निवडणूक प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित करणे.
- निवडणूक प्रक्रिया कमकुवत करण्यासाठी होत असलेल्या पद्धतशीर प्रयत्नांची दखल घेऊन जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे.
- निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेची पुष्टी करणारी सार्वजनिक विधाने जारी करणे आणि लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरुद्ध चेतावणी देणे.