कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र नंतर आता भाजपा पश्चिम बंगालमध्ये शिंदे पॅटर्न राबवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये भाजपा फूट पडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जसे सत्तांतर घडले तसे पश्चिम बंगालमध्ये होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या दाव्यामुळे खळबळ
भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिथुन चक्रवर्ती गतवर्षीच भाजपामध्ये दाखल झाले होते. बुधवारी, २७ जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामधील २१ आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपा दंगे करतो असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, असे आरोप करणे हा केवळ एका कारस्थानाचा भाग आहे. भाजपाला मुस्लिमविरोधी म्हटले जाते, मात्र असे का म्हणतात, हे मला कळत नाही.
(हेही वाचा महाबळेश्वरमधील पॉइंट्सची नावे बदलणार?)
Join Our WhatsApp Community