मंत्री परबांनंतर सेनेच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर!

वाशीम येथल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी बालाजी पर्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर सेनेला लगोलग आणखी एक धक्का बसला. शिवसेनेच्या वाशीम जिल्ह्यातील खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांनावर ईडीने धाडी टाकल्या. भाजपाने गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती. त्या तपासानुसार ईडीने आता भावना गवळी यांच्या यवतमाळ आणि वाशीम इथल्या संस्थांनावर धाडी टाकल्या आहेत.

मला ईडीचे कोणतीही नोटीस आलेली नाही. संस्थांवर ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट केले जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातले एकच वाक्य पकडायचे आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडलेला आहे. माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतले आहेत. विद्या देण्याचे काम त्या ठिकाणाहून होत आहे. मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नाही.
– भावना गवळी, खासदार, शिवसेना

किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप!

वाशीम येथल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी बालाजी पर्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार ईडीने वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे धाडी टाकल्या. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पर्टिकल बोर्ड, बीएमसी कॉलेज, भावना ऍग्रो प्रॉडक्ट्स सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत.

(हेही वाचा : आता शिवसेनेच्या ‘अनिल’ना आली ईडीची नोटीस)

काय आहे प्रकरण?

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार मंडळाने २९ कोटी रुपये, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. एवढे अनुदान देऊनही हा कारखाना सुरु करण्यात आला नाही. उलट ७ कोटी मूल्य दाखवून तो गवळी यांनी दुसऱ्या कंपनीला विकला. याच प्रकरणात गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांनी चुकीचा अहवाल तयार करून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here