Congress पळपुटी; ट्विट डिलीट करत काढला पळ

मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांच्या टिकेनंतर ट्विट डिलीट करण्याची काँग्रेसवर नामुष्की

163
विदर्भातील जागा कमी करणे, Congress ला पडू शकते अडचणीचे ?
  • प्रतिनिधी

एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपाबाबतचे ट्विट काँग्रेसने (Congress) केले होते. त्यावर मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी ‘भारत तोडणे हेच काँग्रेसचे धोरण’ असल्याची घणाघाती टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पळ काढत ट्विट डिलीट केले आहे.

(हेही वाचा – Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाची नवीन दिवाळी मुदतठेव योजना; मिळणार ७.३० टक्के व्याज)

फोडा आणि राज्य करा, ही नीती राबविणाऱ्या काँग्रेसचे (Congress) भारत तोडणे हेच धोरण आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केला आहे. याला काँग्रेसचे मिळणारे समर्थन देशासाठी घातक आहे.

(हेही वाचा – Wayanad By Election : सत्यन मोकेरी यांच्यामुळे वायनाडचा गड प्रियंका गांधींना अवघड जाणार का?)

देशाच्या विभाजनाला जबाबदार असलेला काँगेस आणि त्यांचे नेते देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब करत आहेत. भारत जोडो यात्रा काढणारेच भारत तोडोच्या मार्गावर चालले आहेत. देशासाठी लढणाऱ्या शुरविरांवर शंका घेऊन त्यांना बदनाम करण्याचे काम काँग्रेसी करत आहेत. देशविरोधी काँग्रेसला (Congress) महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल असा टोलाही मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी लगावला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.