वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात सध्या पश्चिम बंगालमध्ये मुसलमान रस्त्यावर उतरले असून ते हिंसाचार करत आहेत. मुसलमानांनी मुर्शिदाबाद (Murshidabad) येथे हिंदूंची हत्या केली, त्यामुळे हिंदू पलायन करू लागले आहेत. आता २४ परगणा जिल्ह्यातही मुसलमानांनी हिंसाचार सुरु केला आहे.
हिंसक मुसलमानांनी पोलिसांची वाहने पेटवली. मुर्शिदाबादमध्ये (Murshidabad) पॅरामिलिटरी फोर्सने संचलन करत तिथला हिंसाचार आटोक्यात आणला. हिंसाचार करून जाळपोळ करणाऱ्या 150 मुस्लिम आंदोलकांना अटक केली. त्या पाठोपाठ मुर्शिदाबादमधली (Murshidabad) परिस्थिती सामान्य बनायला सुरुवात झाली. एकीकडे पॅरामिलिटरी फोर्सच्या कठोर कारवाईनंतर मुर्शिदाबाद शांत होत असताना दुसरीकडे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लिम आंदोलकांनी 24 परगणा जिल्हा पेटवायचा प्रयत्न केला.
मुसलमानांनी आमदार नौशाद सिद्दिकी याच्या नेतृत्वाखाली कोलकत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बांगर, मियाखान आणि संदेशखली परिसरामध्ये मोठमोठे बॅरिकेट्स लावून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात चिथावणीखोर घोषणा देत पोलिसांचीच वाहने पेटवून दिली. पोलिसांनी तिथे देखील पॅरामिलिटरी फोर्सची मदत मागितली. (Murshidabad)
Join Our WhatsApp Community