BJP : मोदी-शहानंतर फायरब्रॅंड योगी ‘इन-डिमांड’

निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते.

199
BJP : मोदी-शहानंतर फायरब्रॅंड योगी 'इन-डिमांड'
BJP : मोदी-शहानंतर फायरब्रॅंड योगी 'इन-डिमांड'

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाचा शंखनाद अद्याप केलेला नाही. तरीसुध्दा, भाजपशासित राज्याच्या एका मुख्यमंत्र्याची तारीख मिळविण्यासाठी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील पदाधिकाऱ्यांनी रांगा लावल्या असल्याची चर्चा भाजपच्या मुख्यालयात ऐकायला मिळत आहेत. बघू या कोण आहेत ते मुख्यमंत्री? निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. भाजपशासित मध्यप्रदेश आणि काँग्रेसशासित छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. याशिवाय, तेलंगणा आणि मिझोरम येथे सुध्दा निवडणूक होणार आहे. (BJP)

भारतीय जनता पक्षाने सर्व राज्यांमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उडी मारण्यासाठी सज्ज आहेत. प्रचार कसा करायचा? प्रचारसभा कोठे घ्यायच्या? कुणाकुणाच्या घ्यायच्या? आणि कधी घ्यायच्या? यासर्व गोष्टींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणुकीची घोषणा होताच प्रचाराचा धडाका लावायचा असा भाजपचा प्लान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकट्या छत्तीसगड राज्यांमध्ये पाच सभा घेण्याचे पक्षाने ठरविले असल्याची चर्चा आहे. (BJP)

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर भाजपशासित राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांची खूप डिमांड आहे. यांची प्रचार सभा आपल्या राज्यात व्हावी असे तिन्ही राज्यांतील नेत्यांना वाटत आहे. मोदी-शहा यांच्यानंतर ज्यांची सर्वाधिक डिमांड आहे ते आहेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. आदित्यनाथ हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त मागणी असलेले नेते आहेत. भाजपने सुध्दा योगी आदित्यनाथ यांच्या भरपूर सभा घेण्याची योजना आखली आहे. छत्तीसगडमध्येही त्यांच्या निवडणूक रॅली होणार आहेत. छत्तीसगडमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहे. (BJP)

(हेही वाचा – Child Sexual Abuse : मोदी सरकारकडून ट्विटर, यूट्युब आणि टेलिग्रामला नोटिस)

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये सहा जिल्ह्यांना मिळून एक विभाग तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक विभागात मोदींच्या एक सभा घेऊन संपूर्ण छत्तीसगडला कव्हर करण्याची भाजपची योजना आहे. या सभांमध्ये सर्व उमेदवारांनाही बोलाविण्यात येणार आहे. सध्या या पाच रॅलींचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून, तो पीएमओकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या रॅली इतर भागातही व्हाव्यात, असे वाटले तर सभांची संख्या आणखी वाढविली जाऊ शकते. सध्या रायपूर, बिलासपूर, दुर्ग, बस्तर आणि सरजुगा येथे त्यांची सभा जवळपास निश्चित झाली आहे. भाजप लवकरच आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर करू शकते. (BJP)

भाजपने छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्था या दोन मुद्यांना निवडणुकीचे शस्त्र बनविण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सरकार आणि त्यांचे मंत्री आणि आमदार यांच्याविरोधातील सत्ताविरोधी लाट भाजपला फायद्याची ठरेल, अशी भाजपला आशा आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर पडता येऊ नये यासाठी भाजपने खासदार विजय बघेल यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. विजय बघेल हे भूपेश बघेल यांचे पुतणे आहेत आणि 2008 मध्ये त्यांनी याच जागेवर भूपेश बघेल यांचा पराभव केला होता. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.