खेलरत्न पुरस्कारावरून काँग्रेसचा रडीचा ‘डाव’! 

पंतप्रधान मोदी यांनी या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले, त्यामागची भूमिका स्पष्ट केली, तरीही काँग्रेसला मात्र ती पचनी पडली नाही. काँग्रेसने याबाबत कांगावा सुरु केला आहे.

98

एखादा पुरस्कार त्याच क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वाच्या नावाने दिल्यास त्या क्षेत्रातील कलाकार किंवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. हा सर्वसाधारण संकेत आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव देण्यात आले, मात्र हा शुद्ध हेतू काँग्रेसच्या पचनी पडले नाही, म्हणूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून भूमिका मांडताना म्हटले कि, देशाला गर्व अनुभव होत असतानाच्या वातावरणात देशवासीयांचा एक आग्रह समोर आला. खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित करावे. लोकांच्या भावना पाहता त्या पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केले जात आहे.

१९९१ साली खेलरत्न पुरस्काराला सुरुवात झाली आहे. त्यासाठी खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले, त्यामागची भूमिका स्पष्ट केली, तरीही काँग्रेसला मात्र ती पचनी पडली नाही. काँग्रेसने याबाबत कांगावा सुरु केला आहे.

(हेही वाचा : खेलरत्न पुरस्काराची ओळख आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने!)

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंबंधी टीका करताना म्हटले कि, ‘मेजर ध्यानचंद यांचे नाव भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या राजकीय उद्देशांसाठी वापरले नसते, तर चांगले झाले असते. राजीव गांधी या देशाचे नायक होते, पुढेही राहतील. राजीव गांधी हे पुरस्कारांनी नव्हे तर त्यांचे हौतात्म्य, विचार आणि आधुनिक भारत निर्माणासाठी ओळखले जाते, असे म्हटले आहे

तर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका करताना, ‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची खूप मागणी आहे कि, अहमदाबादच्या स्टेडियमचे नाव हटवून त्याला खेळाडूचे नाव देण्यात यावे. खेळाडूंच्या सन्मानामध्ये राजकारण का आणता?, असे म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करताना म्हणाले, ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहे. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.