भाजपाचे कोण आहेत ते साडे तीन नेते? राऊतांच्या वक्तव्याने सुरु झाला शोध

123

शिवसेना भवनात मंगळवारी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली होती. आता याच पत्रकार परिषदेसंबंधी सोमवारी राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत, भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. ‘हमने बहुत बरदाश्त किया है…तो बरबाद भी हम ही करेंगे, असं म्हणत राऊतांनी भाजपाचे साडेतीन नेते, अनिल देशमुख असलेल्या तुरुंगात असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं म्हणत, गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता भाजपाचे ते साडे तीन नेते कोण आहेत? याचा शोध सुरू झाला आहे.

उद्या संपूर्ण देश आम्हाला ऐकेल

मंगळवारी होणा-या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असणार आहे. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले. शिवसेनेचे नेते तसेच ठाकरे सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणा सातत्याने चिखलफेक करत असते. त्यामुळे या सगळ्या आरोपांना मंगळवारी आम्ही उत्तर देऊ, तसेच या पत्रकार परिषदेत काय होतं ते पाहा. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडली आहे. आता पुढे काय होतं ते बघा असा इशारा राऊतांनी भाजपाला दिला.

( हेही वाचा: धक्कादायक! हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुसलमानांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ला काय आहे प्लान? )

राऊतांचा गर्भीत इशारा

आम्हाला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. आव्हानं दिली जात आहेत. राजकारणात पण एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागोमाग आता भाजपाचे नेतेही त्याच कोठडीत असतील, हे राज्य सरकार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, असं म्हणतं राऊतांनी भाजपाला गर्भीत इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.