शिवसेना, मनसेनंतर आता बच्चू कडूही करणार अयोध्या दौरा!

241

मनसे, शिवसेना आणि काँग्रेसच्या अयोध्या वारीच्या घोषणेनंतर अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी त्यांना विरोध दर्शवला. अयोध्या दौऱ्यावरून मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलंच तापले असताना आता मंत्री बच्चू कडूनींही अयोध्या वारी करणार असल्याची घोषणा केली आहे. ते अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी याबद्दलची माहिती दिली.

अयोध्या जितकी महत्त्वाची तितकीच हनुमान गढीही महत्वाची असे म्हणत हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी आम्ही भारताचा तिरंगा घेऊन अयोध्याला जाणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. राज्यातील मनसे, शिवसेना आणि काँग्रेसने अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही अयोध्याची वारी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अमरावती बडनेरा येथे बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

(हेही वाचा – “…तर वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, शिवसेनेचा भाजपला सवाल)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. आम्हीही अशाच प्रकारचा अयोध्या दौरा करणार असून त्यासाठी तिरंगा यात्रेचे अयोजन करत आहोत. तिरंगा हे हिंदुस्थानच्या एकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्य एकजुटीने रहावे यासाठी अयोध्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.