MVA मध्ये फूट; काँग्रेसचा ‘स्वतंत्र’चा नारा!

90
MVA मध्ये फूट; काँग्रेसचा 'स्वतंत्र'चा नारा!
  • खास प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत तोंडावर आपटल्यानंतर शिवसेना उबाठातील अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी (शप) सोबत न जाता स्वबळावर लढवावी, असा आग्रह धरला आणि संजय राऊत यांनी तसे संकेतही दिले. यावर आता काँग्रेसकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात आली असून महाविकास आघाडी फुटल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट दिसत आहे. (MVA)

(हेही वाचा – Police Officers Transfer : घरवापसीनंतरही मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक झाडाखाली)

आमचं पाऊलही पुढे

काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उबाठाला स्वतंत्र लढायची असेल तर आम्हीही स्वतंत्र लढण्याची तयारी करू. आमचं पाऊलही स्वतंत्र लढण्यासाठी पुढे पडेल.” (MVA)

पत्रकारांनी उबाठाबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपाला मित्रपक्षाची गरज नाही. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र होतो. मात्र, आजची स्थिती पाहून स्वतंत्र लढायचे असले, तर आगामी निवडणुका आम्ही सुद्धा स्वबळावर लढू.” (MVA)

(हेही वाचा – Sandeep Naik करणार भाजपामध्ये घरवापसी?)

पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेणार

“सगळ्या शहरात आघाडी होणे कठीण आहे. अनेक ठिकाणी आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पुरता महाविकास आघाडी म्हणून विचार करावा. राज्यात प्रत्येक ठिकाणी आघाडी होणार नाही. त्या-त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती आणि पदाधिकारी यांचे मत विचारात घेऊन तो निर्णय व्हावा,” असेही मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. (MVA)

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत उबाठा गट मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचा उल्लेखही वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा वेगळे लढणार असतील तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट काय भूमिका घेणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (MVA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.