विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेवर अंतिम निर्णय दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्णय दिल्यानंतर राज्याचा राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादीवर (NCP) काय निर्णय येणार यावर चर्चा सुरु झाली आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी राष्ट्रवादीची सुनावणी सुरु केली, शनिवारी सुनावणी आटोपल्यावर आता नार्वेकर यांनी यासाठी वेळ वाढवून घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार
राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार पात्रतेवर निर्णय घेण्यासाठी १० दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र वेळ वाढवून घेण्यासाठी नार्वेकर यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अध्यक्ष नार्वेकर सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत. यासाठी ते दोन्ही गटांची परवानगी घेणार आहेत. त्यानंतर न्यायालयाला अवगत करणार आहेत. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी लागू शकतो. २९ आणि ३० जानेवारीला दोन्ही गटांना अंतिम बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. ही सुनावणी ३१ जानेवरीपर्यंत संपवली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल देण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community