धक्कादायक! अनिल देशमुखांचा उत्पादन शुल्क खात्यातही बदल्यांचा भ्रष्टाचार? कुणी केले आरोप?

124
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी याद्या पाठवत असत, असा कबुली जबाब माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केल्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख अन्य खात्याचे मंत्री असतानाही असाच बदली संदर्भात भ्रष्टाचार करत होते, असा धक्कादायक खुलासा आणखी एका निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राकडे केला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तब्बल ९० अधिका-यांची पाठवलेली यादी

सध्या देशमुख हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांच्या बदलीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. आता देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री असतानाही असाच भ्रष्टाचार करत होते, असा धक्कादायक खुलासा आणखी एका प्रशासकीय अधिकाऱ्याने केला आहे. माजी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की ते २०००-२००१ या काळात देशमुख उत्पादन शुल्क मंत्री होते, तर कुलकर्णी हे या खात्याचे आयुक्त होते. त्यावेळी देशमुख यांनी राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उप-निरीक्षक यांच्या बदलीची यादी आपल्याला पाठवली होती. यातील अनेकांच्या बदल्या या नियमबाह्य पद्धतीने कराव्या लागणार होत्या. मी त्याला विरोध केल्यामुळे माझी बदली वाहतूक विभागात करण्यात आली. देशमुख यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्या आधीच १० एप्रिल २०२० रोजी कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपण अनिल देशमुख यांना ‘एक्स्पोस’ करणार असे म्हटले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.