दादरमधील पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने महाआरती करण्यात आली. तब्बल सहा वर्षांनी दादरच्या या हनुमान मंदिरात महाआरती झाली आहे. त्यामुळे सहा वर्षांनी शिवसेनेने या मंदिरात येवून महाआरती केल्याचे पहायला मिळाले आहे.
महाआरतीचे आयोजन
शक्तीदेवता श्रीहनुमानाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून उभ्या हिंदुस्थानासह महाराष्ट्राचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी शिवसेना विभाग क्रमांक १०च्यावतीने विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर आणि महिला विभाग संघटक श्रध्दा जाधव यांच्यातर्फे या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
(हेही वाचाः शिवसेनेच्या चुकीमुळेच सहा वर्षांपासून ४ लाख कुटुंबे हक्काच्या पाण्यापासून राहिली वंचित)
सहा वर्षांपूर्वी झाली होती महाआरती
सन २०१६-१७ मध्ये मुंबईतील धार्मिक स्थळांबाबत महापालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये दादरमधील या पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिराचाही समावेश होता. त्यावेळी शिवसेना शाखेच्यावतीने मंदिर बचावाकरता महाआरती करण्यात आली होती. त्यानंतर या हनुमान मंदिरात आजतागायत महाआरती करण्यात आली नव्हती. परंतु शनिवारी हनुमान जयंतीच्या दिनी शिवसेनेच्यावतीने तब्बल पाच ते सहा वर्षांनी महाआरती करण्यात आली आहे.
अयोध्यावारीनंतर महाआरती पण…
तर नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्यावारी केल्यानंतर मुंबईतील २६ ठिकाणी शिवसेनेने महाआरती केली होती. यामध्ये दादरमधील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली नव्हती. प्रभादेवी येथील सिध्दिविनायक मंदिरात महाआरती करण्यात आली होती. तर त्यापूर्वी १९९२ मध्ये झालेल्या दंगलीनंतर मुंबईत अनेक ठिकाणी महाआरती करण्यात आली होती.
(हेही वाचाः राऊतांचा उडाला गोंधळ, हनुमान चालिसा सांगत म्हटलं ‘मारुती स्तोत्र’! पहा व्हिडिओ)
Join Our WhatsApp Community