एका बाजूला उद्धव ठाकरे हे शिवसेना आपलीच आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचेच आहेत. माझे वडील आहेत त्यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करू नका असे शिंदे गटाला सांगत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे घराण्यातीलच परंतु मातोश्रीच्या बाहेर राहणारे ठाकरे कुटुंबातील एक एक सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत असल्याने ठाकरे कुटुंबातही शिंदे गटाला समर्थन देण्यावरून फूट पडलेली पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंना धक्का
दोन दिवसांपूर्वी जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी आपण कोणत्याही राजकीय हेतूसाठी ही भेट घेतली नाही. तर आपण सामाजिक कार्य करत आहोत, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे, असे म्हणाल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी, २९ जुलै रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि बिंदू माधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निहार ठाकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. निहार ठाकरे हे आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्द सुरु करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही चर्चा केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देईन”, अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली.
(हेही वाचा नवनीत राणांच्या जीवाला धोका? हितचिंतकाने पत्र पाठवत अलर्ट राहण्याचा दिला सल्ला)
Join Our WhatsApp Community