मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवल्याने याचे परिणाम देशातील इंडी आघाडी तसेच महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून, महाविकास आघाडीतील काँग्रेसची (Congress) बार्गेनिंग पॉवर कमी होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. (Congress)
या निकालांमुळे देशातील इंडी आघाडी व राज्यातील महाविकास आघाडी (MVA) या दोन्हींमधील काँग्रेसची (Congress) बार्गेनिंग ताकद मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची (Congress) लोकसभेला राज्यात एकच जागा निवडून आलेली असतानाही शिवसेनेतील फुटीनंतर परिस्थिती बदललेली असून विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेस नेतृत्व सर्वाधिक लोकसभेच्या जागा मागण्याचे संकेत देत होते. आता शिवसेना उबाठा त्यांच्या अवाजवी मागण्या मान्य करण्याची शक्यता संपली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपचा दरारा पूर्वीपेक्षा खूप वाढणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shiv Sena) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी (NCP) यांच्या पारड्यात त्यामुळे लोकसभेच्या किती जागा पडणार याबाबत आता नवी समीकरणे मांडली जातील. (Congress)
(हेही वाचा – PM Narendra Modi : पराभवाचा राग संसदेत काढू नका)
महाराष्ट्रामध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीमुळे काँग्रेस एक संघ असल्याने त्यांची बार्गिनिंग पॉवर जास्त होती. त्यामुळेच शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांना काँग्रेसचे ऐकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. परंतु आता तीन राज्यात भाजपला मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कुठेतरी बॅकफूटवर आल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे आता सिट शेअरिंगच्या वेळी काँग्रेसला (Congress) याचा परिणाम भोगावा लागेल हे मात्र नक्की. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community