काँग्रेसनंतर (Congress) आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) मित्रपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (UBT) गटानेही वंचितवर संशय व्यक्त करत, नाव न घेता, खडे बोल सुनावले. “यावेळेला कुणीही.. कुणीही.. मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही,” असे उबाठा नेते संजय राऊत यांनी ठणकावले. तर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी चेंडू राऊत यांच्याच कोर्टात टाकत, “हा इशारा काँग्रेस की राष्ट्रवादीला (शरद पवार गट) (NCP-Sharad Pawar), याचा खुलासा राऊतांनीच करावा,” अशी प्रतिक्रिया दिली. (UBT)
वंचितची चर्चा अंतिम टप्प्यात
राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की राष्ट्रवादीसोबत जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. “वंचित आघाडीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत. यावेळेला कुणीही मागच्या दाराने भाजपला मदत करणार नाहीत,” असा इशारा दिला. (UBT)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : कुठल्या वस्तू-मंदिरात निषिद्ध ; प्रवेशासाठी काय आहेत नियम जाणून घ्या)
शिवसेना आणि वंचितचा २४-२४ चा फॉर्म्युला
यासंदर्भात आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारले असता त्यांनी हा इशारा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला दिला असल्याचे सांगितले. तसेच वंचित आणि उबाठाची (UBT) युती झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे ते त्यांनाच माहीत. शिवसेनेशी आमची युती आहे. शिवसेना आणि वंचितचा २४-२४ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती झालेली नाही. त्यामुळे राऊतांचा रोख कुणाकडे याचा त्यांनीच खुलासा करावा,” असे आंबेडकर म्हणाले. (UBT)
भाजपची ‘बी’ टीम
२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वंचित आघाडीने काँग्रेसच्या आठ ते नऊ जागांचे नुकसान केले होते. त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणून हिणवण्यात आले होते. या लोकसभा निवडणुकीसाठीही वंचितशी युती करण्यास काँग्रेसचा विरोध याच कारणासाठी असल्याचे सांगण्यात येते. (UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community